अमरावतीत अनाथ, दिव्यांग महिलांनी पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क; पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
Published : 2 hours ago
अमरावती : अमरावतीमधील जवळपास 80 अनाथ आणि दिव्यांग महिलांनी आज (20 नोव्हेंबर) पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलाय. शहरातील इशदया चॅरिटेबल मदर टेरेसा मिशनरी ऑफ चॅरिटी या ठिकाणी अनेक वर्षांपासून अनाथ, निराधार आणि दिव्यांग महिलांना आधार दिला जातो. सध्या या ठिकाणी अशा एकूण 80 महिला आहेत. यापैकी तीन-चार महिला वगळता कोणाचीही जन्मतारीख यासह त्यांचं नाव आणि गावाचाही पत्ता नव्हता. सामाजिक कार्यकर्ता डॉ. स्मिता साठे यांच्या प्रयत्नांनंतर या सर्व महिलांची जन्मतारीख निश्चित करुन ती शासनाकडून अधिकृत करण्यात आली. शासनाकडून जन्मतारखेचे दाखले प्राप्त झाल्यानंतर या महिलांचे आधार कार्ड काढण्यात आले. यानंतर मतदार म्हणून त्यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली. या सर्व महिलांना इशदया संस्थेच्या विशेष वाहनानं मतदान केंद्रावर आणण्याची आणि नेण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या महिलांना मतदान केंद्रात येण्याकरिता आणि बाहेर पडण्याकरिता मदत केली.