लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या...
Published : Oct 28, 2024, 10:15 AM IST
अमरावती : सध्या सगळीकडं दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी करावं, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. याचं कारण म्हणजे अनेक पंचांग आणि कॅलेंडरमध्ये लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरलाच होत असल्याची नोंद आहे. परंतु, 31 ऑक्टोबरला अमावस्येला सुरुवात होत असल्यामुळं लक्ष्मीपूजन हे 31 ऑक्टोबरला करावं की 1 नोव्हेंबरला याबाबत अनेकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळं लक्ष्मीपूजन नेमकं केव्हा करावं यासंदर्भात अमरावतीच्या श्री एकवीरा देवी संस्थानचे पुजारी दीपक पाठक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले, "31 ऑक्टोबर रोजी चतुर्दशी समाप्ती दुपारी 3 वाजून 53 मिनिटांनी होईल. यानंतर अमावस्या सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबरला शुक्रवारी सायंकाळी 6 वाजून 37 मिनिटांपर्यंत अमावस्या असेल. त्यानंतर प्रतिपदा सुरू होईल आहे, " असं दीपक पाठक यांनी स्पष्ट केलंय.