मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मयुरेश वांजळे झाले भावूक; म्हणाले... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Oct 25, 2024, 11:38 AM IST
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होताना पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पुणे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून किशोर शिंदे, हडपसर विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. पुणे शहरातील मनसेच्या तीन उमेदवारांमध्ये मयुरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरलेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मयुरेश यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी मयुरेश वांजळे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच खडकवासला मतदारसंघातून निवडून येण्याचा विश्वासदेखील मयुरेश यांनी यावेळी व्यक्त केला.