महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

तीन दिवसाच्या गौराईसाठी साकारला 100 वर्षांपूर्वीचा साई मंदिर देखावा, पाहा व्हिडिओ - jyeshtha Gauri Pujan

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 6:18 PM IST

शिर्डी jyeshtha Gauri Pujan : भाद्रपदात गणपती पाठोपाठ गौरीचं आगमन होतं. गणपतीसोबत गौरी हा सण देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिर्डीतील मिराणे कुटुंबियांनी शंभर वर्षीपूर्वीचा साईमंदिराचा देखावा तयार करुन गौराई समोर मांडलाय. राज्यात गणेश उत्सवात तीन दिवस गौराईची स्थापना असते. प्रथम दिनी आगमन होतं, दुसऱ्या दिवशी त्यांना 16 भाज्यांसह मिष्टानांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी त्यांना महालक्ष्मी म्हणतात, तर काही ठिकाणी ज्येष्ठा, कनिष्ठा म्हणून महिला त्यांची मनोभावे स्थापना करतात. 

साई मंदिराचं 100 वर्षांपूर्वीचं मॉडल : मिराणे कुटुंबाची नवसाला पावणारी गौराई म्हणून तिची ओळख आहे. मिराणे कुटुंब म्हणजे साईबाबांचे समकालिन भक्त काशीराम शिंपी यांचा वारसा लाभलेले. त्यांचे पणतू आज 83 वर्षाचे असून त्यांनी साईबाबा मंदिराचं 100 वर्षांपूर्वीचं मॉडल तयार केलय. यात दगडी बुटी वाडा म्हणजेच आत्ताचं साईबाबा समाधी मंदिर, गुरुस्थान, साठेवाडा, दीक्षितवाडा आणि मराठी शाळा अशी प्रतिकृती स्वतःच्या हाताने तयार करुन गौराई समोर मांडली आहे. शे सव्वाशे वर्षापूर्वी साई मंदिर कसं होत हे पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details