महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा अर्थसंकल्प; शितल कालरा यांनी व्यक्त केली भावना
Published : Feb 1, 2024, 5:02 PM IST
मुंबई Sheetal Kalra On Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प मानला पाहिजे. या अर्थसंकल्पात महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्याची प्रतिक्रिया आयएमसीच्या डेप्युटी डायरेक्टर शितल कालरा यांनी व्यक्त केली आहे.
अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी विशेष भर देण्यात आला आहे. महिलांचं शिक्षण आणि महिलांचं प्रशिक्षण याकडंही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर बालकांच्या आरोग्यासाठी सर्वस्तरावर लसीकरण करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यासोबत महिला उद्योजक तयार व्हाव्यात, यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच महिलांच्या सुरक्षेवरही भर दिला गेला आहे. निर्भयासारख्या योजना अधिक प्रभावीपणे कशा राबवल्या जातील, याबाबत या अर्थसंकल्पामध्ये लक्ष देण्यात आलं असल्याचंही कालरा म्हणाल्या.