देशात 'इंडी' आघाडी सत्तेत आल्यास 'मिशन कॅन्सल', मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा प्लॅन - Narendra Modi Beed Sabha - NARENDRA MODI BEED SABHA
Published : May 7, 2024, 10:48 PM IST
बीड PM Narendra Modi Beed Sabha : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) जाहीर सभा घेतली. पहिल्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा सुपडा साफ झाल्याची टीका मोदींनी केलीय. तिसरा टप्पा संपल्यानंतर इंडिया आघाडीच्या सर्व आशा संपलेल्या दिसंतील असं देखील ते म्हणाले. मात्र, इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ते ‘मिशन कॅन्सल राबवतील’, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीडमध्ये बोलताना व्यक्त केली. इंडिया आघाडीचा उल्लेख 'इंडी' असा करत मोदी म्हणाले, 'इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ते मिशन कॅन्सल राबवतील. कलम 370 नरेंद्र मोदींनी आणलं, म्हणून तो निर्णय रद्द करण्याचं काम इंडिया आघाडी करेल. तिहेरी तलाक कायदा, मोदी किसान सन्मान योजना, मोफत रेशन योजना अशा योजना ते रद्द करतील, अशी शंका त्यांनी उपस्थित केलीय. काँग्रेस राम मंदिराच्या विरोधात होती. त्यामुळंच राम मंदिराच्या बाजूनं निर्णय बदलण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी बैठक बोलावली होती, असा दावा मोदींनी केला. इंडिया आघाडी सरकार सत्तेवर आल्यास राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही रद्द करतील, असं मोदी म्हणाले.