दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया - ST George Hospital Case - ST GEORGE HOSPITAL CASE
Published : Aug 8, 2024, 2:52 PM IST
मुंबई ST George Hospital Case : मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी रुग्णालयामध्ये गदारोळ केल्याचं पाहायला मिळालं होतं. या घटनेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अनुकंपाखाली कार्यरत असलेल्या सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरी गेलेला असताना तो पडला आणि त्याला जखम झाली. त्याला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळेस डॉक्टर उपस्थित नव्हते असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यावरुन दोन डॉक्टरांना तात्पुरतं निलंबित केलं आहे. तसंच या संदर्भासाठी आपण चौकशी समिती नेमली आहे. या समितीची अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.