महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सिमेंटपासून तयार केलेल्या बनावट लसूणची होतेय विक्री-निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दावा, पहा व्हिडिओ - Akola Cement Garlic - AKOLA CEMENT GARLIC

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 10:57 PM IST

अकोला : अकोला शहरातील बऱ्याच ठिकाणी फेरीवाले बनावट लसूण विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचारी सुभाष पाटील यांच्या घरी सिमेंटचा लसूण आढळला आहे. सुभाष पाटील यांच्या पत्नीनं फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतला. मात्र जेवण करताना लसूणच्या पाकळ्या सुद्धा वेगळ्या होत नव्हत्या.  त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, तो लसूण चक्क सिमेंटचा आहे. यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. अकोला शहरात सध्या लसणाचे भाव हे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.  अशातच बनावट लसणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ भाजीविक्रेत्यांकडून लसूण विकत घेताना खबरदारी घ्यावी, असं आवाहनसुद्धा सुधाकर पाटील यांनी केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details