'फूट पाडा आणि राज्य करा'; दिग्विजय सिंह यांचा थेट मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Nov 17, 2024, 8:22 PM IST
श्रीरामपूर : येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी शेवटचा दिवस आहे. "फूट पाडा आणि राज्य करा ही इंग्रजांची निती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ अवलंबत आहेत," अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहांनी केली. दिग्विजय सिंह श्रीरामपुरात काँग्रेसच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी योगी आणि मोदी यांच्यावर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी काँग्रेसला झोडपून काढत काँग्रेसमध्ये इंग्रजांचे डीएनए आल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना दिग्विजय सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजर प्रक्रियेचा समाचार घेत इंग्रज निती वापरत असल्याची टीका केली.
दिग्विजय सिंह ऑन वोट जिहाद : "'वोट जिहाद' हा शब्द कुठून आलाय? जिहाद म्हणजे एखाद्या गोष्टीत सक्रियता असते. आज सर्वच पक्ष मतदान करण्यासाठी सांगताय, मग यात वोट जिहाद कुठून आला?" असा सवाल देखील दिग्विजय सिंहांनी उपस्थित केलाय. अजित पवार अनुभवी असतील तरी त्यांना चार्ज करणारे शरद पवार असल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं.