देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; थेट नावातच केला बदल, म्हणाले,"आजपासून माझं नाव..." - देवेंद्र फडणवीसांनी केला नावात बदल
Published : Mar 8, 2024, 10:36 PM IST
नागपूर Devendra Fadnavis News : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आज (8 मार्च) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लावणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महिला दिनाच्या निमित्तानं तमाम मातृ शक्तीला वंदन करतो. मला अतिशय आनंद होतोय की महिला दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या वतीनं आज नवीन महिला धोरण जाहीर केलं गेलंय. पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो, मात्र आता माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असेल," असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर त्यांचं राजकीय वर्तुळातून कौतुक केलं जातंय.