बनावट कागदपत्राचा घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई सुरू; देवेंद्र फडणवीस यांची माहिती - बनावट कागदपत्र घोटाळा
Published : Mar 4, 2024, 11:05 PM IST
नागपूर Devendra Fadnavis : मंत्रालयात बनावट कागदपत्राचा घोटाळा उघड झाला आहे. याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह वकीलावर गुन्हा दाखल झालाय. या संदर्भात प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संदर्भात डिटेल्स लवकरच देऊ मात्र, काही लोक बनावट गोष्टी करत आहेत हे आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून यापूर्वीही दोन-तीन ठिकाणी कारवाई झाली होती. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.
"नोट फॉर वोट" या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. जर प्रकरण भ्रष्टाचाराचं असेल तर कुणालाही इम्युनिटी देण्याचा कारणच नाही. जरी आरोप असलेली व्यक्ती खासदार, आमदार असली, तरी त्याला भ्रष्टाचार करण्याचा परवाना तर देता येत नाही. १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता, त्या निर्णयामुळं काही लोकांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून इम्युनिटी मिळाली होती. मात्र, न्यायालयानं आज जे काही निर्णय दिला आहे, तो चांगला निर्णय आहे, आम्ही त्याचा स्वागत करतो, असं फडणवीस म्हणाले.