महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, ''मराठा समाजाला सगळ्यात आधी फडणवीसांनी न्याय दिला'', पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 10:50 PM IST

सातारा Maratha Reservation :  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश आल्याचं मानलं जातंय. त्याचं श्रेय साताऱ्यातील भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosle) यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. अनेक नेते मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यापैकी कोणीही मराठ्यांना न्याय दिला नाही; परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यात आधी तो न्याय देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Deputy CM Devendra Fadnavis) ब्राह्मण असल्यामुळे ते मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाहीत, अशी त्यांच्यावर टीका व्हायची. त्या टीकेला या निर्णयातून देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांनीच उत्तर दिलंय. 

शिवेंद्रराजेंचा संजय राऊतांना टोला: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, ''शेतात काम करणं चुकीचं अथवा कमीपणाचं देखील नाही. मुख्यमंत्री हे शेतकरी आहेत. त्यामुळे शेतात काम केलं तर त्यात वाईट काय? शेतात काम करून मुंबईला जाऊन त्यांनी आरक्षण दिलं. आता संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानावेत'', असा टोला त्यांनी खासदार राऊतांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details