दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर रुळाला तडा; ट्रॅकमॅनच्या सतर्कतेनं मोठी दुर्घटना टळली, पाहा व्हिडिओ - ट्रॅकमॅन कीमन रामेश्वर मीना
Published : Feb 2, 2024, 6:16 PM IST
कोटा (राजस्थान) Crack On The Track : कोटा रेल्वे विभागांतर्गत दिल्ली मुंबई रेल्वे मार्गाच्या डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना समोर आलीय. ट्रेन क्रमांक 12955 मुंबई सेंट्रल जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस काही मिनिटांनी तुटलेल्या रुळावरुन पुढं जाणार होती. ही ट्रेन ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगानं जातं होती. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. ट्रॅकमॅन कीमन रामेश्वर मीना हे रुळाची पाहणी करत होते. यावेळी त्यांना तडा गेल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला लाल झेंडा दाखवून थांबवलं. सुमारे अर्धा तास ही ट्रेन थांबवण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं. त्यानंतर रेल्वे गाड्या संथ गतीनं सोडण्यात आल्या. ट्रॅकमॅननं समयसुचकता दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली.