छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे जनतेच्या मनातून उतरले- दीपक केसरकर - Deepak Kesarkar - DEEPAK KESARKAR
Published : Sep 23, 2024, 2:16 PM IST
शिर्डी Deepak Kesarkar On Amol Kolhe : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी 'पन्नास खोके एकदम ओके, वाघाचे झाले बोके' अशी घोषणाबाजी करत महायुती सरकारवर टीका केली होती. या टीकेला आता मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय. दीपक केसरकर यांनी रविवारी (22 सप्टेंबर) शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिर प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क विभागाचे प्रशांत सूर्यवंशी यांनी साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन केसरकरांचा सत्कार केला. साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकरांनी अमोल कोल्हेंवर टीका केली. ते म्हणाले, "ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली ते आज खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातून उतरलेत. अमोल कोल्हे हे एक चांगले कलाकार असल्यानं त्यांचा आदर होता, पण तो आज त्यांनी गमावलाय." तसंच खोके तुम्ही घेतले आम्ही जनतेच्या हितासाठी बंड केल्याचंही केसरकर म्हणाले.