बर्फात अडकलेल्या नवरदेवाला सीआरपीएफच्या जवानांनी काढलं बाहेर, पाहा व्हिडिओ
Published : Feb 20, 2024, 10:51 PM IST
पुलवामा CRPF rescued the Bridegroom : काश्मीर खोऱ्यातील डोंगराळ भागात आज (20 फेब्रुवारी) बर्फवृष्टी झाली. त्यामुळं अनेकांनी आज घरामध्ये थांबण्यालाच प्राधान्य दिलं. मात्र, पुलवामाच्या त्राल शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या बारन पाथरी येथील स्थानिक गुलाम हसन पोसवाल यांचा मुलगा मुख्तार अहमद यांचं आज लग्न होतं. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाड लग्नाच्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं होतं. अशा स्थितीत स्थानिकांनी सीआरपीएफ 180 बटालियनच्या मंडुराह कॅम्पला कॉल केला. त्यानंतर सीआरपीएफ बचावकर्त्यांची एक टीम त्याठिकाणी पोहोचली. त्यांनी नवरदेवाला आणि वऱ्हाडाला लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्यास मदत केली. यावेळी सीआरपीएफच्या 180 बटालियनच्या मंदुरा कॅम्पच्या बचावकर्त्यांचे स्थानिकांनी कौतुक केलं. यावेळी वर मुख्तार अहमद यांनी सीआरपीएफचे आभार मानलं.