Published : Jun 30, 2024, 8:18 AM IST
क्रिकेटप्रेमींचा नादच खुळा; विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत मरीन ड्राईव्हसह विविध ठिकाणी एकच जल्लोष, पहा व्हिडिओ - T20 World Cup 2024
मुंबई Cricket fans celebrations in Mumbai : टी-20 विश्वचषक 2024 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर कब्जा केला. शेवटच्या काही षटकात भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. तब्बल 17 वर्षांनी टी-20 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम भारतानं केला आहे. भारताने मिळवलेल्या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांचा उत्साह गगनात मावेनासा झालाय. विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे जल्लोष करण्यात आला. काही तरुणांनी थेट रस्त्यावर ढोल-ताशे वाजवत आनंदोत्सव साजरा केला. तर काही चाहत्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. या सर्व क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमींनी वरळी, लोअर परळी, जोगेश्वरी, मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्कमध्ये रस्त्यावर उतरत जल्लोष साजरा केला आहे.