महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आमदार अपात्रतेचा निर्णय निवडणुकीपर्यंत लागेल - घटनातज्ञ उल्हास बापट - Constitutional Expert Ulhas Bapat - CONSTITUTIONAL EXPERT ULHAS BAPAT

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 3:01 PM IST

Updated : Aug 6, 2024, 7:07 PM IST

पुणे Constitutional Expert Ulhas Bapat : आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलं होतं. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील आज होणारी सुनावणी दोन आठवडे पुंढ ढकलण्यात आली. यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ज्यांच्यावर राज्यघटनेनं अंपायरचं काम सोपवलं आहे. मग स्पीकर असो, गव्हर्नर असो, चीफ इलेक्शन कमिशन असो, यांची विश्वासार्हता फार कमी होत चालली आहे. पक्षांतर बंदीसाठीमध्ये 1975 साली राजीव गांधी यांनी घटना दुरुस्ती केली. पक्षांतर केल्यामुळं लोकशाही अधोगतीला जात आहे आणि त्यामुळं पक्षांतर करु नये हा त्याचा उद्देश होता. परंतु आता लोकशाही मजबूत करण्याऐवजी त्यातून पळवाट शोधण्याचं काम राजकीय पक्ष करत आहेत. दुर्देवानं वकीलसुद्धा तेच करत आहेत. ऐका त्यावर घटनातज्ञ उल्हास बापट काय म्हणाले.

Last Updated : Aug 6, 2024, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details