महाराष्ट्र

maharashtra

धारूरमध्ये एका रात्रीत बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा! - Chhatrapati Shivaji Maharaj statue

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 12:53 PM IST

धारूर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (Source reporter)

धारूर Chhatrapati Shivaji Maharaj Statue : बीडच्या धारूर शहरात आज (14 जून) सकाळी अचानक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौथऱ्यावर नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा पाहायला मिळाला. मात्र, रातोरात हा पुतळा कोणी बसवला? यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. किल्ले धारुर शहरातील बस स्थानकावर राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यादृष्टीनं येथे नगर परिषदेच्या वतीनं चौथराही निर्माण करण्यात आलाय. मात्र, शासकीय नियमावलीच्या दिरंगाईमुळं अद्यापपर्यंत येथे पुतळा बसवण्यात आलेला नव्हता. मात्र, आज चौकातील चौथऱ्यावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याचं बघायला मिळालं. तर हा किल्ला बघण्यासाठी सकाळपासून शिवप्रेमी गर्दी करत आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details