ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंच्या गाडीवर हल्ला; चालकानं सांगितला हल्ल्याचा थरार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published : Feb 10, 2024, 1:39 PM IST
पुणे Attack On Nikhil Wagle Car : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात आयोजित निखिल वागळे यांच्या कार्यक्रमाला भाजपाकडून जोरदार विरोध करण्यात आला. या नंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना ठिकठिकाणी त्यांची गाडी फोडण्यात आली. पहिल्यांदा खंडूजी बाबा चौक तर पुन्हा शास्त्री रोड आणि दांडेकर पूल चौकात गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि शाईफेक देखील करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चा तसेच पतीत पावन संघटनेच्या आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी ही गाडी फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांची गाडी चालवणारा चालक वैभव कोठुडे यानं हल्ल्याचा संपूर्ण थरार सांगितला आहे. एकूणच कशी आणि कुठं कुठं गाडी फोडण्यात आली, याचा थरार ऐकूया प्रत्यक्ष चालक वैभव कौठुडे याच्याकडून.