बर्फात निघाली लग्नाची वरात; वधू-वराचा डान्स एकदा पाहाच - हिमवृष्टीत लग्नाची वरात
Published : Feb 4, 2024, 11:51 AM IST
मंडी (हिमाचल प्रदेश) Wedding In Snowfall : लग्नसमारंभात बँड, बाजा आणि मिरवणुका ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र त्यावेळी जर आकाशातून बर्फ पडू लागला तर काय मज्जा येईल ना! असंच काहीसं हिमालच प्रदेशात घडलं आहे. 1 फेब्रुवारीपासून राज्यातील अनेक भागात हिमवृष्टी होत असून या दरम्यान लग्नसराईचेही शुभ मुहूर्त आहेत. काही विवाहसोहळ्यांमध्ये पावसानं व्यत्यय आणला, तर काहींच्या लग्नामध्ये हिमवृष्टी झाली. मात्र यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस संस्मरणीय ठरला. असेच दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोन्ही व्हिडिओ मंडी जिल्ह्यातील आहेत. व्हिडिओमध्ये हिमवृष्टीत वधू-वर लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना दिसतायेत. या व्हिडिओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पाहा हे व्हिडिओ