जोरदार शक्तीप्रदर्शन करत बापूसाहेब पठारे यांनी भरला उमेदवारी अर्ज
Published : Oct 28, 2024, 7:07 PM IST
पुणे : विधानसभेच्या महासंग्रामला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली असून आज पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला. पुणे शहरात देखील विविध मतदारसंघातील उमेदवारांनी आज आपलं उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाकडून उमेदवारी मिळालेले माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पठारे यांनी पुर्ण मतदारसंघात रॅली काढून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना येथील जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळं जनतेने यंदा बापूसाहेब पठारे यांनाच आमदार करण्याचा निश्चय केला आहे. या मतदारसंघातून कोणाचं आवाहन नाही असं पठारे यांनी म्हंटलंय.