महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वडगाव शेरी विधानसभेसाठी बाप-लेकात चुरस; कोणाला मिळणार उमेदवारी? - Maharashtra Assembly Election 2024 - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 7:49 PM IST

पुणे Maharashtra Assembly Election 2024 : येत्या एक ते दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलीय. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्नवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महानिर्धार बैठकीचं आयोजन केलं असून त्यासाठी जय्यत तयारी केलीय. मात्र, बापू पठारे यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे हेही आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळं शरद पवार आता बाप की बेटा कोणाला उमेदवारी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुरेंद्र पठारे यांनी, "गेल्या तीन वर्षांपासून मी आगामी विधानसभेची तयारी करत असून मी देखील इच्छुक आहे," असं सांगितलं. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू, असंही सुरेंद्र पठारे यांनी म्हटलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details