अशोक चव्हाण हे कुठल्याही पक्षात गेलेले नाहीत, ते परत येणार- आमदादर के सी पाडवी - अशोक चव्हाण
Published : Feb 12, 2024, 9:17 PM IST
नंदुरबार: काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेला उधाण आलं. यासोबतच अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले आमदार तथा माजी मंत्री ॲड. के सी पाडवी हे देखील चव्हाण सोबत जातील का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आमदार पाडवी म्हणाले की, मी घरी बसणं पसंत करेल; मात्र काँग्रेस पक्ष सोडणार नाही. "अशोक चव्हाण हे सध्या सुरू असलेल्या राजकारणाचे बळी पडले आहेत. परंतु ते अजून कुठल्याही पक्षात गेलेले नाहीत. त्यामुळे ते परत येणार" असा अंदाज पाडवी यांनी व्यक्त केला आहे. "यापूर्वीदेखील मला भाजपाकडून ऑफर होती. मात्र मी काँग्रेस पक्ष न सोडण्याचा निर्धार मनात घेतला आहे. अशोक चव्हाणांनी नेमक्या कुठल्या कारणासाठी पक्षाचा राजीनामा दिला हे मात्र सांगता येणार नाही," असं आमदार पाडवी यावेळी म्हणाले.