अशोकराव चव्हाणांसोबत भाजपानं माइंड गेम खेळला- आमदार प्रणिती शिंदे
Published : Feb 12, 2024, 10:30 PM IST
सोलापूर Praniti Shinde On Ashok Chavan Resignation : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोकराव चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांसोबत भाजपाने माइंड गेम खेळला. ईडीच्या चौकशा लावणे, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणणं यामुळं अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला. अशोक चव्हाणांवर वारंवार दबाव टाकण्यात आला. त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. म्हणून कदाचीत हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला असेल, असं त्या म्हणाल्या.