‘याचि देही याचि डोळा'!; इंदापुरात पार पडले तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण; पाहा गोल रिंगणाचे ड्रोन दृश्य - Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala - SANT TUKARAM MAHARAJ PALKHI SOHALA
Published : Jul 10, 2024, 5:40 PM IST
पुणे Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : आषाढी वारी (Ashadhi Wari) जवळ येत आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे येत आहेत. यंदा 17 जुलै 2024 आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi 2024) साजरी होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण आज इंदापूर मधल्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडलं. सकाळी इंदापुरात पोहचलेल्या पालखीचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती.
ड्रोनद्वारे टिपण्यात आले नयनरम्य दृश्य : हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचं रुपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झालं, तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं. आज टाळ मृदुंगाचा गजर, आसमंतात फडकणाऱ्या पताका, श्री विठूरायांच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. तर या सोहळ्यातील नयनरम्य दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आलं आहे.