आषाढी एकादशी 2024: कलाकारानं तांदुळावर साकारली विठ्ठलाची कलाकृती, पाहा व्हिडिओ - Ashadhi Ekadashi 2024 - ASHADHI EKADASHI 2024
Published : Jul 17, 2024, 12:28 PM IST
सिंधुदुर्ग Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्तगण आपली भक्ती विविध माध्यमातून पांडूरंगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कलावंतदेखील आपल्या कलेतून विठुरायाची भक्ती करत आहेत. देवगड तालुक्यातील गवाणे येथील कलाकार अक्षय मेस्त्री यांनी तांदळावर विठूरायांची कलाकृती साकारलीय. अक्षय यांनी एक्रलिक कलर वापरुन अवघ्या ५ ते १० मिनिटात विठ्ठलाची कलाकृती साकारली आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी चक्क छोट्याश्या तांदळाच्या दाण्यावर अतिशय सुबक विठूरायाची प्रतिमा रेखाटली. त्यांनी रेखाटलेल्या चित्राची उंची ३ मिमी आणि लांबी १ मिमी आहे. अक्षय यांनी अतिशय सुक्ष्म ब्रशचा वापर करुन तांदळावर विठूरायांचं चित्र तयार केलं. विठूराया प्रती असलेली भक्ती त्यांनी आपल्या कलेतून सादर केली. तांदळावरील विठ्ठलाचं सूक्ष्म चित्र काढण्याची कला पाहून अनेकजण कलाकाराचं कौतुक करत आहेत.