"राज्यात महायुतीचं सरकार येणार नाही असं फडणवीसांनी...", नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Nov 17, 2024, 1:24 PM IST
पुणे : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच राज्यात जातीयवाद आणि व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलंय. यासंदर्भात कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) खासदार अमोल कोल्हे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या महायुतीचं सरकार येणार नाही, अशी कबुली दिली आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते नाहीत ,असं फडणवीस म्हणाले होते. याचाच अर्थ असा की राज्यात महायुतीचं सरकार येणार नाही." तसंच राज्याची संस्कृती आहे. त्यापलीकडं जाऊन व्होट जिहादची भाषा करनं त्यांना शोभत नाही, असंही कोल्हे म्हणाले. यावेळी अमोल कोल्हे यांना अजित पवार यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, "जी भूमिका वर्षभरापूर्वी काही लोकांनी घेतली होती. ती का घेतली? त्याची पार्श्वभूमी काय? हे पाहता महाराष्ट्राला गद्दारी ही कधीही आवडलेली नाही. त्यामुळं पराभव दिसून आल्यानं अशा पद्धतीनं भावनिक आवाहन ते करत आहेत", असं खासदार कोल्हे म्हणाले.