महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कॅफेशॉपमधील बलात्काराच्या घटनेनंतर सांगलीत शिवप्रतिष्ठाननं 3 कॅफेशॉप फोडले; व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण - Sangali Crime - SANGALI CRIME

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 3:34 PM IST

सांगली Sangali Crime News : शहरातल्या कॅफेशॉपवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून हल्लाबोल करण्यात आलाय. शहरातील तीन कॅफेशॉपची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून तोडफोड करण्यात आली. गुरुवारी सांगली शहरातील एका कॅफेशॉपमध्ये एका अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देऊन बलात्काराची घटना घडली होती. यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी विश्रामबाग परिसरातील तीन कॅफेशॉप एकामागून एक फोडली आहेत. जोरदार घोषणाबाजी करत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कॅफेशॉपमध्ये घुसून साहित्याची प्रचंड नासधूस केली. यानंतर विश्रामबाग पोलिसांकडून शिवप्रतिष्ठानच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी विश्रामबागेतल्या तोडफोड झालेल्या कॅफेशॉपच्या ठिकाणी धाव घेत सर्व घटनेचा आढावा घेतला. शहरातील एकाच वेळी तीन कॅफेशॉपच्या तोडफोडीच्या घटनेमुळं एकच खळबळ उडालीय. 

ABOUT THE AUTHOR

...view details