नागपुरात विदर्भवादी आक्रमक : वेगळ्या विदर्भ राज्यासाठी विधानभवनावर मोर्चा - Vidhan Bhavan march in Nagpur - VIDHAN BHAVAN MARCH IN NAGPUR
Published : Aug 10, 2024, 6:18 PM IST
नागपूर March on Vidhan Bhavan : स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे विधानभवनावर लाँग मार्च काढण्यात आला. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, वाढलेले वीजदर तत्काळ मागं घ्यावेत, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशा अन्य मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. क्रांती दिनाचं औचित्य साधून विदर्भवादी कार्यकर्त्यांनी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्याचा इशारा दिल्यानं लाँग मार्चच्या मार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. लाँग मार्चचा मार्ग यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा होता. मात्र, पोलिसांनी लाँग मार्चला झिरो माईल चौकात अडवल्यानं विदर्भवादी कार्यकर्ते आक्रमक झाले. विदर्भवादी नेते वामनराव चटप, प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या लाँग मार्चमध्ये हजारो विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांची संख्या मोठी असल्यानं सीताबर्डी, झिरो माईल आणि विधान भवन परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. भारतीय जनता पक्षानं 2014 साली केंद्रात सत्तेत आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचं जाहीर अभिवचन दिलं होतं. परंतु भाजपा आणि इतर राजकीय पक्षांनी हा विषय राजकीय सोयीसाठी मागं टाकला. त्यामुळं वेळोवेळी विदर्भवादी याकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करतात.