महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

'हे' 5 सेफ्टी गॅजेट्स करणार महिलांची सुरक्षा - Women Safety Gadgets - WOMEN SAFETY GADGETS

Women Safety Gadgets : देशात महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. महिलांना घराबाहेर पडताच अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. यामध्ये सर्वात मोठी चिंता त्यांच्या सुरक्षेची आहे. अशा परिस्थितीत, महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही तुम्हाला पाच गॅजेट्स सांगत आहोत, जे तुम्हाला धोकादायक परिस्थितीतून वाचवू शकता.

Representative photograph
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 4, 2024, 7:02 PM IST

हैदराबाद Women Safety Gadgets :महिलांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळं महिला बाहेर पडण्यास घाबरतात. मात्र, अशा वेळी महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात अनेक गॅजेट्स उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही धोक्यातून बाहेर पडू शकता. महिलांच्या सुरक्षा गॅझेट काय असंत? ते कसं काम करतात? याबाबत आज आपण माहिती घेऊया.

अलार्म कीचेन :जेव्हा महिला आणि मुली एकट्या फिरत असताना त्यांना नेहमी अलार्म कीचेन जवळ ठेवावं. हल्लेखोरांनी हल्ला केल्यास या गॅझेट्समुळं तुम्हाला नक्की मदत होईल. अशावेळी तुम्ही या कीचेनच्या वरच्या बाजूला असलेली कळ ओढून समोरचं बटण दोनदा दाबल्यास मोठा आवाज होऊन अलार्म वाजेल. त्यानंतर तुम्हाला मदत हवी असल्याचा संदेश जाईल. मात्र, त्यावेळी जवळ कोणी नसल्यास तुम्ही कीचेनच्या बाजूचं बटण दाबल्यास समोरील एलईडी लागेल. त्यामुळं तुम्हाला मदत हवी असल्याचं बाजूच्या नागरिकांना कळेल. अलार्मला बंद करण्यासाठी तुम्ही कीचेनच्या समोरील बटण दाबावं.

मिरपूड स्प्रे : मिरपूड स्प्रे महिलांच्या स्वसंरक्षणासाठी खूप उपयुक्त आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पीडितांच्या डोळ्यांवर फवारणी केल्यास खाज सुटते तसंच जळजळ होते. धोक्याच्या तीव्रतेनुसार, समोरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आवश्यक तितक्या वेळा त्यांच्या डोळ्यात फवारणी केली जाऊ शकते. त्यामुळं तुम्ही धोक्यातून बाहेर पडू शकता. महिला आणि विद्यार्थिनींनी बाहेर जाताना त्यांच्या हँडबॅगमध्ये आणि बॅगमध्ये हा स्प्रे घेऊन जाणे चांगलं.

फिंगर टीप रिंग्स :अचानक धोका उद्भवल्यास काय करावे, हे आपल्याला कळत नाही. अशावेळी उपलब्ध असलेली गॅजेट्स कदाचित ऑपरेट करणं अवघड जातं. पण, या 'फिंगर टीप रिंग्ज' अशा संकटाच्या वेळी आपली मदत करू शकतात. जर तुम्हाला रात्री एकटं बाहेर जावं, लागत असेल, तर तुम्ही नखांवर या फिंगर रिंग्स घातल्यास मदत होईल. हल्लेखोरांनी हल्ला केल्यास, तुम्ही त्यांच्यावर प्रतिहल्ला करू शकता.

Stealodeal चेन : धोक्याच्या वेळी महिलांसाठी ही कीचेन उपयुक्त आहे. यात टॉर्च, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, बॉटल ओपनर इत्यादी विविध साधने आहेत. त्यामुळं आपण आपला बचाव करू शकतो. याचं वजन खूप हलके असंत. त्यामुळं बाहेर जाताना ते सहज नेलं जाऊ शकतं.

लाल मिरची स्प्रे : महिला आणि मुलींनी बाहेर जाताना त्यांच्या पिशवीत लाल मिरची स्प्रेची बाटली ठेवावी. रात्रीच्या वेळी एकट्यानं प्रवास करताना हल्लेखोरांनी हल्ला केला, तर लगेच डोळ्यांवर फवारणी करावी. आणीबाणीच्या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी अनुकूल गॅजेट्स अतिशय उपयुक्त आहेत. हे Flipkart आणि Amazon सारख्या ॲप्सवर उपलब्ध आहेत. दर्जा, रंग आणि डिझाइननुसार वेगवेगळ्या किमतीत ते बाजारात उपलब्ध आहेत. काही प्रमाणात हे धोक्याच्या वेळी आपल्यासाठी ढाल म्हणून काम करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details