हैदराबाद :Vodafone-Idea नं देशात 5G सेवा सुरू केलीय. मात्र ही सेवा भारतातील निवडक 17 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर व्होडाफोननं अखेर आपल्या ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली आहे.
या 17 शहरांमध्ये मिळणार सेवा :Vodafone Idea नं मुंबई, दिल्ली,बेंगळुरू, कोलकाता, चेन्नईसह भारतातील 17 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. कंपनीनं 3.3GHz आणि 26GHz स्पेक्ट्रम बँडवर 5G सेवा सुरू केली आहे. ताज्या अहवालानुसार, Vodafone Idea ची 5G सेवा देशातील 17 परवाना क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आली आहे. Vodafone Idea नं 3.3GHz आणि 26GHz स्पेक्ट्रम बँडसह 5G सेवा सुरू केली आहे. या 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी, Vi च्या प्रीपेड ग्राहकांना 475 रुपयांच्या प्लानसह रिचार्ज करावं लागेल. पोस्टपेड ग्राहकांना 1101 रुपयांच्या प्लानसह रिचार्ज करावं लागेल.
- 1. दिल्ली-(ओखला इंडस्ट्रियल एरिया फेज 2, इंडिया गेट, प्रगती मैदान)
- 2. कोलकाता- (सेक्टर-5 आणि सॉल्ट लेक)
- 3. राजस्थान- जयपूर (गॅलेक्सी सिनेमा, मानसरोवर औद्योगिक क्षेत्र, RIICO)
- ४. मुंबई-(वरळी, मरोळ अंधेरी पूर्व)
- 5. महाराष्ट्र- पुणे (शिवाजी नगर)
- 6. आंध्र प्रदेश – हैदराबाद (एडा उपल, रंगा रेड्डी)
- 7. गुजरात- अहमदाबाद (दिव्य भास्कर जवळ, कॉर्पोरेट रोड, मकरबा, प्रल्हाद नगर)
- 8. उत्तर प्रदेश पूर्व - लखनौ (विभूती खंड, गोमती नगर)
- 9. उत्तर प्रदेश - आग्रा (जेपी हॉटेल जवळ, फतेहाबाद रोड)
- 10. मध्य प्रदेश – इंदूर (इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स, परदेशीपुरा)
- 11. बिहार- पाटणा (अनिशाबाद गोलांबर)
- 12. पंजाब- जालंधर (कोट कलान)
- 13. कर्नाटक- बेंगळुरू (डेअरी सर्कल)
- 14. पश्चिम बंगाल- सिलीगुड़ी
- 15. केरळ- (थ्रीक्काकडा, काकनाड)
- 16. हरियाणा- कर्नाल (HSIIDC, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 3)
- 17. पंजाब- जालंधर (कोट कलान)