स्टॉकहोम Nobel Prize 2024 :सन 2024 साठीचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना देण्यात येणार आहे. स्टॉकहोममधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये नोबेल असेंब्लीनं ही घोषणा केली. मायक्रोआरएनएचा शोध आणि ट्रांसक्रिप्शननंतर जीनमधील भूमिका यासाठी या वर्षी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे. हे संशोधन म्हणजे "जीवांच्या उत्क्रांतीच्या आणि कार्य करण्याच्या पद्धतीसाठी मूलभूतपणे महत्त्वपूर्ण असल्याचं सिद्ध होत आहे", असं नोबेल असेंब्लीनं म्हटलं आहे.
काय आहे संशोधन? : या वर्षीचं नोबेल पारितोषिक शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना मायक्रोआरएनए या सूक्ष्म रेणूच्या शोधाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. जे जनुकांच्या क्रियाकलापांचं नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जरी आपल्या शरीरातील सर्व पेशींची जनुके सारखीच असली तरी स्नायू आणि चेतापेशी यांसारख्या विविध प्रकारच्या पेशींची कार्ये वेगवेगळी असतात.