हैदराबाद ISRO SpaDex Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स मिशनचं प्रक्षेपण करणार आहे. रात्री 10 वाजता स्पॅडेक्स मिशनचं प्रक्षेपण होणार आहे. इस्रोनं सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. इस्रोच्या या मोहिमेचे यश भारतीय अंतराळ स्थानक (BAS) आणि चांद्रयान-4 मोहिमेचे यश ठरवेल, असा विश्वास आहे. त्यामुळे हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
🎉 Launch Day is Here! 🚀
— ISRO (@isro) December 30, 2024
Tonight at precisely 10:00:15 PM, PSLV-C60 with SpaDeX and innovative payloads are set for liftoff.
SpaDeX (Space Docking Experiment) is a pioneering mission to establish India's capability in orbital docking, a key technology for future human… pic.twitter.com/147ywcLP0f
स्पॅडेक्स मिशन काय आहे ? : या मोहिमेत दोन उपग्रह आहेत. दोन्ही उपग्रहांचं वजन सुमारे २२० किलो असेल. त्यापैकी एक चेझर असेल आणि एक उपग्रह लक्ष्य असेल. या मोहिमेचं मुख्य लक्ष्य डॉकिंग आणि अनडॉकिंग करणे आहे. अंतराळ डॉकिंग प्रयोग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केला जाईल. हा प्रयोग पृथ्वीपासून सुमारे ४७० किमी अंतरावर असेल. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, दोन्ही उपग्रह दोन वर्षे पृथ्वीभोवती फिरतील. उपग्रह चेझरमध्ये कॅमेरा आहे. तर उपग्रह लक्ष्यात दोन पेलोड आहेत. या प्रयोगामुळं भविष्यात इस्रोला कक्षेतून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या दिशेने जाणारा भाग पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञान मिळणार आहे. याशिवाय कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होणार आहे. स्पेसेक्स मिशनमध्ये दोन भिन्न अंतराळयान अंतराळात एकमेकांशी जोडलेले दाखवले जातील.
डॉकिंग तंत्रज्ञान म्हणजे काय? : इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश अंतराळात डॉकिंग-अनडॉकिंग तंत्रज्ञानाचं यशस्वीपणे प्रात्यक्षिक करणं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, दोन्ही उपग्रह अंतराळात या तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांशी जोडले जातील. याला डॉकिंग म्हणतात. त्यानंतर, दोन्ही उपग्रह अंतराळात वेगळे होतील. याला अनडॉकिंग म्हणतात. इस्रोनं हे अभियान पूर्ण केले, तर भारत असं करणारा चौथा देश बनेल. दोन्ही उपग्रह ताशी २८ हजार किमी वेगानं अवकाशात प्रवास करतील. दोन्ही उपग्रहांना या वेगानं जोडावे लागेल आणि वेगळं करावं लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया टक्कर न होता पूर्ण करावी लागेल.
भारतासाठी हे का महत्त्वाचे आहे? : जगातील फक्त तीन देश, अमेरिका, रशिया आणि चीनकडं अवकाशात डॉकिंग तंत्रज्ञान आहे. या देशांनी हे तंत्र कोणासोबतही शेअर केलेलं नाही. भारत स्वतःहून हे यश मिळवेल. जर भारतानं ही मोहीम यशस्वी केली तर भारत हा चौथा देश बनेल. अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञानाच्या आगमनानं भारताला मोठा फायदा होईल. या तंत्रज्ञानामुळं भारताला अंतराळ केंद्र स्थापन करता येईल. याशिवाय, चांद्रयान-4 च्या यशात हे तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावेल. म्हणूनच डॉकिंग सिस्टममध्ये प्रभुत्व मिळवणं, ही भारतासाठी एक मोठी उपलब्धी असेल.
चांद्रयान-4 मिशनसाठी महत्त्वाचं : चांद्रयान-4 साठी अंतराळात डॉकिंग हे अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. डॉकिंग म्हणजे वेगवेगळे भाग एकमेकांच्या दिशेने आणणे आणि त्यांना जोडणे. अंतराळातील दोन भिन्न गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास मदत करेल. चांद्रयान-4 प्रकल्पातही त्याची मदत होईल. स्पॅडेक्स म्हणजेच एका उपग्रहाचे दोन भाग असतील. हे एकाच रॉकेटमध्ये ठेवून प्रक्षेपित केले जातील. हे दोन्ही अवकाशात वेगवेगळ्या ठिकाणी सोडले जातील.
कमी खर्चाचे मिशन : SpaDeX (स्पेस डॉकिंग प्रयोग) मिशन हे इस्रोचे कमी किमतीचे तांत्रिक अभियान आहे. PSLV रॉकेटच्या मदतीनं अंतराळात दोन लहान वाहनं डॉकिंग आणि अनडॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणं करणार आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, हे तंत्रज्ञान भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी जसे की चंद्रावर मानवी मोहीम, चंद्रावरून नमुने आणणे आणि भारतीय अंतराळ स्थानकाचे (BAS) बांधकाम आणि ऑपरेशनसाठी खूप महत्वाचे आहे.
'हे' वाचलंत का :