हैदराबादNissan Magnite facelift : वाहन उत्पादक Nissan भारतीय बाजारपेठेत SUV प्रकारात दोन कारची विक्री करतेय. त्यापैकी एक एंट्री लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणि दुसरी फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये त्यांनी बाजारात आणली आहे. कंपनी ऑक्टोबरमध्ये नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एंट्री लेव्हलमध्ये ऑफर केलेल्या मॅग्नाइटची नवीन आवृत्ती आणली जाईल, किंवा नवीन कार पुढील महिन्यात लॉन्च होईल?, याची उत्सुकता टिकून आहे.
4 ऑक्टोबरला लॉन्च करणार : Nissan कंपनी ऑक्टोबर महिन्यात नवीन कार लाँच करण्याची शक्यता आहे. निसान कंपनी कार भारतीय बाजारपेठेत 4 ऑक्टोबरला लॉन्च करणार आहे. पण, निसान मॅग्नाइटचे फक्त फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं जाईल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Nissan Magnite ची फक्त फेसलिफ्ट आवृत्ती :याबात कंपनीनं अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्याची SUV Nissan Magnite ची फक्त फेसलिफ्ट आवृत्ती ऑक्टोबर महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीनं ही SUV भारतात पहिल्यांदा डिसेंबर 2020 मध्ये लॉन्च केली होती. त्यानंतर आता ति अपडेटसह लॉंच केलं जाईल.