हैदराबादHow lightning strikes : पावसाळ्याच्या दिवसात पृथ्वी हिरवीगार होते. जणू पृथ्वीनं हिरवा शालूच नेसलाय, असं मनमोहक दृष्य आपल्याला पहायला मिळतं. पावसाळ्यात विजांचा झगमगाट हे निसर्ग मातेच्या सामर्थ्याचं आकर्षक परंतु भयानक तितकच भीतीदायक रुप आपल्याला दिसतं. त्यामुळं वीज मानवासाठी प्राणघातक देखील ठरू शकते. पण पाऊस पडतो, तेव्हा वीज नेमकी कशी चमकते?, ती जमीनीवर कशी पडते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण याच विजेच्या पडण्याचं सत्य जाणून घेणार आहोत.
विजेची निर्मिती :वीज (लाइटनिंग) हा एक प्रचंड इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज असलेला प्रकार आहे. जो ढगांच्या घर्षणामुळं निर्मणा होतो. या वीजेची प्रक्रिया ढगांमध्ये विद्युत शुल्क जमा होण्यापासून सुरू होते. जेव्हा पावसाचं ढग निर्माण होतं, तेव्हा ढगातील अपड्राफ्ट्स आणि डाउनड्राफ्ट्समुळं पाण्याचे थेंब आणि बर्फाचे स्फटिक एकमेकांवर आदळतात, ज्यामुळं वीज निर्माण होते.
विजांच्या निर्मितीमध्ये पावसाची भूमिका : विजांच्या निर्मितीमध्ये पावसाची भूमिका महत्त्वाची असते. पाऊस जितका मुसळधार असेल, तितकी वीज पडण्याची शक्यता जास्त असते.
बर्फ आणि पाण्याची टक्कर :पाऊस ढगात बर्फ आणि पाण्याचं मिश्रण तयार करण्यास मदत करतो. त्यामुळं बर्फाचे कण जेव्हा ढगांवर आदळतात, तेव्हा ते प्रचंड इलेक्ट्रॉन्स निर्माण करतात. ज्यामुळं विद्युत लहरी वेगळ्या होतात.
इलेक्ट्रिकल चार्ज सेपरेशन :ढगाचा वरचा भाग सकारात्मक (प्लस) उर्जा तयार करतो, तर ढगाचा खालचा भाग नकारात्मक (माइनस) उर्जा तयार करतो. त्यातूनच विजेचा जन्म होतो.
लीडर स्ट्रोक :जसजसं इलेक्ट्रिकल चार्ज तयार होतो, तसतसं आयनीकृत हवेच्या रेणूंचं एक चॅनेल तयार होतं. ज्याला लीडर स्ट्रोक देखील म्हणतात. हे चार्ज ढग आणि जमिनी दरम्यान तयार होऊ लागतं.
स्ट्राइक : जेव्हा लीडर स्ट्रोक जमिनीवर पोहचतो, तेव्हा स्ट्रोक विजेसाठी एक प्रवाहकीय मार्ग तयार करतो. याला रिटर्न स्ट्रोक म्हणून ओळखलं जातं. हाच स्ट्रोक आपल्याला विजेसारखा दिसतो. रिटर्न स्ट्रोक 50 हजार डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत पोहोचू शकतो, जे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा पाच पट जास्त गरम असतो.