हैदराबादNEW CAR LAUNCHES IN SEP 2024 : यंदाचा सणासुदीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असून, सणासुदीच्या काळात प्रत्येकजण आपल्या घरात काहीतरी नवीन आणण्याचा विचार करतो. हे लक्षात घेऊन कार उत्पादक कंपन्या आपली काही नवीन उत्पादनं बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. काही कार कंपन्या नवीन उत्पादनं लाँच करत आहेत, तर काही कंपन्या त्यांच्या सध्याच्या उत्पादनांना फेसलिफ्ट अपग्रेड करणार आहेत. चला तर मग एक नजर टाकूया सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च होणाऱ्या नवीन कार्सवर...
1. Tata Curvv ICE : देशांतर्गत कार उत्पादक टाटा मोटर्सनं या महिन्याच्या सुरुवातीला बाजारात आपली नवीन कूप SUV Tata Curvv EV लाँच केली होती. कंपनी 2 सप्टेंबर रोजी त्याची ICE आवृत्ती लॉन्च करणार आहे. लॉन्चसोबतच त्याची किंमतही समोर येणार आहे. नवीन Curvv कंपनीच्या नवीन EV-प्रथम धोरणाचा भाग आहे. ज्या अंतर्गत त्यांची EV आवृत्ती पूर्वी लाँच करण्यात आली होती.
Tata Curvv ICE : ICE आवृत्तीमधील इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल, 1.2-लीटर TGDi टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनचा पर्याय ग्राहकांना दिला जाऊ शकतो. यात सर्व इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCA गिअरबॉक्ससह जोडलं जाणार आहे. Tata Curvv ही भारतीय बाजारपेठेतील डिझेल-डीसीटी कॉम्बो असलेली पहिली कार असेल.
2. Hyundai Alcazar फेसलिफ्ट : पुढील महिन्यात, फेसलिफ्टेड Hyundai Alcazar देखील भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल. यासोबतच कंपनीनं या एसयूव्हीची बुकिंगही सुरू केली असून कार 25,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai ची ही नवीन SUV 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. बाहेरील मोठ्या बदलांव्यतिरिक्त, 2024 Hyundai Alcazar ला दोन मोठ्या स्क्रीन्स, ADAS सूट, नवीन अपहोल्स्ट्री आणि इतर गोष्टी मिळणार आहे. तथापि, पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह कार मार्केटमध्ये येणार आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड डीसीटी आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल.
3. मर्सिडीज-मेबॅक EQS :लक्झरी कार उत्पादक Mercedes-Maybach 5 सप्टेंबर रोजी नवीन Mercedes-Maybach EQS लाँच करणार आहे. ही फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही गेल्या वर्षी चीनमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाली होती. मेबॅक-विशिष्ट इन्सर्ट्स आणि ग्राफिक्ससह इंटिरिअरची EQS SUV नवी थीम ग्राहकांना यात पहायला मिळेल. दुसऱ्या रांगेत MBUX टॅबलेट आणि मागील सीटच्या प्रवाशांसाठी दोन 11.6-इंच स्क्रीन असणार आहेत. या कारला 108.4kWh बॅटरी पॅकमधून पॉवर मिळेल, जे त्याच्या ड्युअल मोटर सेटअपला पॉवर देईल.