कॅनसास सिटी Bats Research :28 ऑगस्ट 2024 रोजी नेचर इकोलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झालाय. संशोधक जॅस्मिन कॅमाचो (पीएच.डी) तसंच संशोधक अँड्रिया बर्नाल-रिवेरा यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी याबाबत अभ्यास केलाय. यावेळी सस्तन प्राण्यांमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण नैसर्गिकरित्या आढळून आलं आहे. या निष्कर्षावरून, वटवाघळांनी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत विषेश रणनिती तयार केल्याचं अभ्यासात दिसून आलं. यावर संशोधक जॅस्मिन कॅमाचो म्हणाले, “आमच्या अभ्यासात रक्तातील साखरेची पातळी नोंदवली गेली. जी आपण निसर्गात पाहिलेली सर्वात जास्त आहे. सस्तन प्राण्यांसाठी कोमा-प्रेरक पातळी प्राणघातक आहे, मात्र ती वटवाघुळांसाठी प्राणघातक नाहीय,”.
वटवाघळाच्या आहारात विविधता : तीस दशलक्ष वर्षांपूर्वी, निओट्रॉपिकल पानांची नाक असलेली वटवाघुळ केवळ कीटकांवरच जगली होती. तेव्हापासून, या वटवाघळांनी स्वत:त बदलून विविध प्रजातींमध्ये विविधता आणली आहे. वटवाघुळ कीटकांपासून, विविध फळं, मांस अगदी रक्तापर्यंतच्या आहारात माहिर आहेत. संशोधकांच्या टीमनं वटवाघळचा एक भाग म्हणून फील्ड वर्क करण्यासाठी उत्तर बेलीझला प्रवास केला. जिथं डझनभर शास्त्रज्ञ विविध वटवाघळाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र येतात.