मुंबई - चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले प्रतिभावान प्रीतिश नंदी आता या जगात नाहीत. प्रीतिश यांचं ८ जानेवारी रोजी निधन झालं. त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. प्रीतिशच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण बॉलिवूड जगत शोकाकुल झाले असताना, ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता प्रीतिशच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यास नकार दिला आहे. नीना गुप्तानं अशी भूमिका घेण्यामागे कारण काय आहे, हेही यानिमित्तानं समजून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी चित्रपट निर्माते, लेखक आणि कवी प्रीतिश नंदी यांच्या निधनाच्या बातमीला पहिल्यांदा दुजोरा दिला. त्यांनी नंदी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून शोक व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रीतिश नंदी यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झालंय आणि धक्का बसला आहे. ' ते एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक-पत्रकार होते'.
Deeply deeply saddened and shocked to know about the demise of one of my dearest and closest friends #PritishNandy! Amazing poet, writer, filmmaker and a brave and unique editor/journalist! He was my support system and a great source of strength in my initial days in Mumbai. We… pic.twitter.com/QYshTlFNd2
— Anupam Kher (@AnupamPKher) January 8, 2025
त्यांनी पुढं लिहिले की, "मुंबईतील माझ्या सुरुवातीच्या काळात ते माझ्यासाठी आधार आणि शक्ती होते. आमच्यात अनेक गोष्टी साम्य होत्या. ते मला भेटलेल्या सर्वात निर्भय लोकांपैकी एक होते. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. फिल्मफेअर आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, द इलस्ट्रेटेड वीकलीच्या मुखपृष्ठावर त्यांनी मला झळकावून दिलं तेव्हा मी ते कधीही विसरू शकत नाही. ते मित्रांच्या मित्राची खरी व्याख्या होते. मित्रा, आपण एकत्र घालवलेला वेळ मला खूप आठवेल."
करीना कपूर
प्रीतश नंदी यांच्याबरोबर चमेली चित्रपटात काम करणारी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनंही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चमेलीच्या सेटवरून प्रीतिशबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आणि लाल हृदय आणि हात जोडून इमोजी जोडून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला.
A true creative genius and a kind soul, you will be missed sir. #PritishNandy 🙏🏼 pic.twitter.com/NKZQ4ITaEm
— Sanjay Dutt (@duttsanjay) January 8, 2025
संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनंही चित्रपट निर्माता प्रीतिश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडच्या मुन्नाभाईंनं xHamster वर प्रीतिशचा फोटो अपलोड केला आणि लिहिलं, "ते एक खरे सर्जनशील प्रतिभावान आणि दयाळू अंतकरणाचे होते. मला तुमची आठवण येईल साहेब."
Shocked and heartbroken by the loss of my dear friend Pritish Nandy. A fearless editor, a brave soul, and a man of his word, he embodied integrity like no other. pic.twitter.com/kMX9nnRjfD
— Anil Kapoor (@AnilKapoor) January 8, 2025
अनिल कपूर
अनिल कपूर यांनी शोक व्यक्त केला आणि त्याच्या X हँडलवर लिहिलं की, "माझा प्रिय मित्र प्रीतिश नंदी यांच्या निधनानं मला धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. एक निर्भय संपादक, धाडसी वृत्ती आणि आपल्या शब्दांवर ठाम असलेला माणूस, त्यांनी इतर कोणापेक्षाही अधिक इमानदारीचा परिचय दिला."
नीना गुप्ता यांच्या धक्कादायक कमेंट्स
दरम्यान, बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या काही कमेंट्स व्हायरल होत आहेत. नीना यांच्या या कमेंटनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. नीना गुप्ता यांनी एका इंस्टाग्राम पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रीतिश नंदी यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यास नकार दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीच्या रागामुळे लोक हैराण झाले आहेत. नीना यांनी त्यांच्या कमेंटमध्ये लिहिलं की, 'त्यानं माझ्याशी काय केलं हे तुम्हाला माहिती नाही का, आणि मी त्याला उघडपणे बास्टर्ड म्हटलं. त्याने माझ्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र चोरले आणि प्रकाशित केले. तर काही RIP नाही, तुम्हाला समजलं असेल, आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे.
यापूर्वी, नीना गुप्ता यांनी ट्विटरवर लोकांना प्रीतिश नंदी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नका असे आवाहन केलं होतं. नीना यांनी म्हटलं होतं की प्रीतिश नंदीनं तिच्याशी खूप वाईट वागणूक दिली आहे. एका मीडिया मुलाखतीत, नीनानं असा दावाही केला होता की प्रीतिश नावाच्या एका व्यक्तीनं तिच्या मुलीच्या वडिलांची ओळख पटवण्यासाठी तिचा जन्म दाखला चोरला होता.
नीना गुप्ता प्रीतिशचा द्वेष का करतात?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीना गुप्ता लग्नाशिवाय गर्भवती राहिल्या. त्यांनी मसाबा नावाच्या मुलीला जन्म दिला. या काळात प्रीतिशनं मसाबाचे जन्म प्रमाणपत्र मिळवलं. त्या प्रमाणपत्राद्वारे असं उघड झालं की मसाबाचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आहेत. हेच कारण आहे की नीना अजूनही प्रीतिशचा द्वेष करतात.