ETV Bharat / sports

मराठमोळा क्रिकेटपटू करणार भाजपामध्ये प्रवेश? 'त्या' एका भेटीनं रंगली चर्चा - KEDAR JADHAV NEWS

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता आणखी एक खेळाडू भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Kedar Jadhav
मराठमोळा क्रिकेटपटू करणार भाजपामध्ये प्रवेश? (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 11 hours ago

Updated : 8 hours ago

मुंबई Kedar Jadhav : विविध क्षेत्रातील खेळाडूंनी राजकारणात येणं भारतात काही नवीन नाही. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यापैकी काही राजकारणातही आले. मात्र, यात काही जण यशस्वी झाले, तर काहींना सपशेल अपयशही मिळालं.

गंभीरही होता खासदार : सध्याचा भारतीय संघाचा कोच आणि माजी सलामीवीर गौतम गंभीरनंही क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं. गंभीरनं तेव्हा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यात एकतर्फी विजयही मिळवला होता. यादरम्यान, आता भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव भाजपामध्ये प्रवेश करु शकतो, अशी चर्चा सध्या सुरु आहे. कारण त्यानं नुकतीच भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

केदार जाधव भाजपात प्रवेश करणार : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. खरं तर, केदार जाधवनं भाजपा संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळं केदार जाधव भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या सदस्य नोंदणी दरम्यान त्यानं ही भेट घेतली आहगे. मात्र केदार जाधव खरंच भाजपामध्ये प्रवेश करणार का, हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. पण त्याच्या या भेटीनं त्याच्या भाजपा प्रवेशाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

रोहित पवारांचीही भेट घेतली होती : केदार जाधवनं यापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचीही भेट घेतली होती. ही भेट वादात देखील सापडली होती. कारण तामिळनाडू विरुद्धच्या सामन्यात खेळत असताना केदार जाधव कौटुंबिक कारणामुळं अर्धवट सामना सोडून गेला होता. मात्र नंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासमवेत दिसला होता. रोहित पवार हे एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, त्यांनी एमसीएची बैठक बोलावली होती, या बैठीकीत केदार जाधव सहभागी झाला होता. आता त्यानं रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली आहे.

केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द : केदार जाधवच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला त्याच्या कारकिर्दीत क्रिकेटच्या सर्वात लांब म्हणजेच कसोटी फॉर्मेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्यानं वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी 73 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 42.09 च्या प्रभावी सरासरीनं 1389 धावा केल्या आहेत. मात्र, T20 सामन्यांत त्याची आकडेवारी काही खास नाही. जाधवनं भारतासाठी केवळ 9 T20 सामने खेळले असून त्यात त्यानं 20.33 च्या सरासरीनं 122 धावा केल्या आहेत.

आयपीएल क्रिकेट कारकीर्द कशी : केदार जाधवनं 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि आतापर्यंत 93 सामन्यांमध्ये 1196 धावा केल्या. यात आरसीबीसाठी त्यानं 17 सामने खेळले आहेत. केदार जाधव 2010 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला तर 2011 मध्ये तो कोची टस्कर्स केरळ संघाचा भाग होता. यानंतर, तो पुन्हा 2013 ते 2015 पर्यंत दिल्ली संघाकडून खेळला आणि नंतर 2016 आणि 2017 मध्ये आरसीबी संघात दाखल झाला. तो 2018 ते 2020 पर्यंत सीएसके संघाचा सदस्य होता आणि त्यानंतर 2021 मध्ये तो हैदराबादकडून खेळला.

हेही वाचा :

  1. सनरायझर्सचा संघ विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी एमआयविरुद्ध उतरणार मैदानात; पहिली मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
  2. सर्वाधिक धावा करणारा खेळाडू संघाबाहेर; नव्या कर्णधारासह कांगारुंच्या संघाची घोषणा

Last Updated : 8 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.