महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

सर्वात स्वस्त Skoda SUV लाँच, Skoda Kylaq बुकिंग सुरू, जाणून घ्या Kylaq ची किंमत

Skoda च्या सर्वात स्वस्त Skoda Kylaq SUV चं बुकिंग सुरू झालं आहे. जाणून घ्या इंजिनपासून फीचर्सपर्यंत संपूर्ण तपशील.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 3, 2024, 10:20 AM IST

हैदराबाद : Skoda Kylaq लॉंच झाल्यापासून चर्चेचा विषय होती. नवीन सबकॉम्पॅक्ट SUV 9.07 लाख रुपये (ऑन-रोड, मुंबईत) लाँच करण्यात आली होती. आता, Skoda नं आपल्या subcompact Kylaq SUV ची संपूर्ण किंमत जाहीर केलीय. Skoda Kylaq च्या किमतीवर एक नजर टाकूया.

Skoda Kylaq बुकिंग :Skoda नं आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Kylaq अवघ्या 7.89 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉंच करून कार बाजारात खळबळ उडवून दिली आहे. या कारच्या आगमनानं, मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टाटा, महिंद्रा यांसारख्या कार कंपन्याना त्यांच्या किंमती कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे. नवीन Skoda Kylaq ची देखील ग्राहक आतुरतेनं वाट पाहत होते. आता कंपनीनं कारचं बुकिंग सुरू केलं आहे. या SUV च्या व्हेरियंटच्या किमतीही आज कंपनीनं जाहीर केलीय.

2 डिसेंबरपासून बुकिंग सुरू : नवीन Skoda Kylaq चं बुकिंग सुरू झालं आहे. याशिवाय, त्याची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. जर तुम्हाला ही SUV पाहायची असेल, तर ती जानेवारीमध्ये भारत मोबिलिटी 2025 मध्ये प्रदर्शित केली जाईल. चला जाणून घेऊया या SUV चे फीचर्ससह इंजिन...

डिझाइन, इंटीरियर :नवीन Skoda Kylaq दिसायला स्पोर्टी आणि स्टायलिश आहे. ही कॉम्पॅक्ट SUV आहे. ज्यामुळं कार शहरात चालवणे सोपं होईल. त्यात चांगली स्पेस देण्यात आली आहे. त्याचा पुढचा आणि मागचा लूक कुशकसारखाच आहे, पण प्रोफाइलवरून तो लहान दिसतो. यात 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात, ज्यामुळं वाहनाची रचना अधिक चांगली दिसते. याशिवाय, ही कार 6 रंगांच्या पर्यायांसह आणली गेली आहे. ज्यात नवीन ऑलिव्ह गोल्डसह लावा ब्लू, टोर्नाडो रेड, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर आणि कँडी व्हाइट रंगाचा समावेश आहे.

उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये : नवीन Skoda Kylaq चं इंटीरियर खूप प्रीमियम आहे. यात ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि कँटनची 6-स्पीकर साउंड सिस्टीम यासारख्या प्रीमियम वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, Isofix चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट, s आणि तीन-पॉइंट सीट बेल्ट आहेत.

शक्तिशाली इंजिन :नवीन Skoda Kylaq 1.0-litre TSi पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजन 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सनं सुसज्ज आहे. कंपनीला या SUV कडून मोठ्या प्रमाणात विक्रीची अपेक्षा आहे. Skoda Kylaq कंपनीसाठी खास कार ही एक अतिशय खास कार आहे, कारण एका दशकानंतर 10 लाखांखालील सेगमेंटमध्ये परत कार लॉंच करण्यात आलीय. स्कोडा कारमध्ये उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आहे.

हे वाचलंत का :

  1. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टीव्हीएसच्या विक्रीत वाढ
  2. Tata Motors च्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये किंचित वाढ
  3. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस का साजरा केला जातो?, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

ABOUT THE AUTHOR

...view details