हैदराबाद :सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 इव्हेंट या महिन्याच्या अखेरीस सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे आयोजित केला जाईल. कंपनीनं मंगळवारी या इव्हेटंची घोषणा केली. या कार्यक्रमात नवीन जनरेशन गॅलेक्सी एस सीरीज लाँच केली जाईल. ही मालिका Galaxy S25 मालिका असेल. कंपनीनुसार हा मोबाईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अनुभवासाठी खास असेल. सॅमसंगनं भारतात फोनसाठी प्री-रिझर्वेशनही सुरू केलं आहे.
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक 2025 तारीख
सॅमसंगनं त्याच्या आगामी Galaxy Unpacked 2025 इव्हेंटबद्दल तपशील शेअर केला आहे. हा कार्यक्रम 22 जानेवारी रोजी सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम Samsung.com, Samsung Newsroom आणि त्याच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केला जाईल. ग्राहक Galaxy प्री-रिझर्व्ह VIP पास मिळविण्यासाठी 1,999 रुपये भरून आगाऊ जागा आरक्षित करू शकतात. आगामी Galaxy फोन खरेदी करताना ई-स्टोअर व्हाउचरद्वारे 5,000 रुपयांचे फायदे मिळवू शकतात.
काय होणार Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये
Samsung नं आधीच पुष्टी केली आहे की, ते Galaxy Unpacked 2025 इव्हेंटमध्ये त्यांची नवीन Galaxy S मालिका लॉंच करेल. जुन्या ट्रेंडनुसार तीन मॉडेल्सची घोषणा होण्याची शक्यता आहे. हे मॉडेल Galaxy S25, Galaxy S25,+ आणि Galaxy S25 Ultra असू शकतात. सर्व प्रकारांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर 12GB RAM सह मानक म्हणून असण्याची अपेक्षा आहे.