हैदराबाद :Samsung Galaxy S25 series मालिका 22 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. खरंतर, सॅमसंग या दिवशी आपला गॅलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात कंपनी नवीन S25 मालिका स्मार्टफोन लाँच करणार आहे. या मालिकेत Galaxy S25, Galaxy S25+ and Galaxy S25 Ultra हे बेसिक व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये, फोनबद्दल अनेक तपशील समोर आले आहेत. या फोनमध्ये क्वालकॉमचा नवीनतम ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. आता, एका टिपस्टरनं हे फोन भारतात कधी विक्रीसाठी उपलब्ध होतील, ते किती रंग आणि स्टोरेज पर्यायांमध्ये येतील याचा खुलासा केला आहे.
Samsung Galaxy S25 series विक्री (अपेक्षित तारीख)
सॅमसंगनं या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या आगामी गॅलेक्सी एस-सिरीजसाठी प्री-रिझर्वेशन सुरू केलंय. या लाइनअपमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस25 मालिकेतील बेस, प्लस आणि अल्ट्रा पर्यायांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. टिपस्टर इशान अग्रवाल (@ishanagarwal24) यांनी एका X पोस्टमध्ये दावा केला आहे, की प्री-ऑर्डर केलेल्या Galaxy S25 मालिकेतील हँडसेटची डिलिव्हरी भारतात 3 फेब्रुवारीच्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर, सर्व खरेदीदारांसाठी विक्री 9 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Samsung Galaxy S25 series रंग (अपेक्षित)
टिपस्टरनं म्हटलंय की, Samsung Galaxy S25 and Galaxy S25 Plus 256 GB and 512 GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. हे प्रकार ब्लू ब्लॅक, कोरल रेड, मिंट, नेव्ही किंवा आइसी ब्लू, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर शॅडो रंगांमध्ये येण्याची अपेक्षा आहे. तर, टॉप-ऑफ-द-लाइन Galaxy S25 Ultra 256GB, 512GB and 1TB स्टोरेज प्रकारांमध्ये येण्याची अपेक्षा आहे. टिपस्टरचा दावा आहे, की हा फोन सात रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम जेड ग्रीन, टायटॅनियम जेट ब्लॅक, टायटॅनियम पिंक गोल्ड, टायटॅनियम सिल्व्हर ब्लू आणि टायटॅनियम व्हाइट सिल्व्हर रंगाचा समावेश असेल.
अल्ट्रा मॉडेलमध्ये एक नवीन डिझाइन
कलरवेजमध्ये सॅमसंग-एक्सक्लुझिव्ह शेड्स समाविष्ट असल्याची अफवा आहे. सॅमसंग गॅलेक्सी S25 मालिकेतील सर्व मॉडेल्स 12GB पर्यंत रॅमला सपोर्ट करतात, असं म्हटले जातं. अलिकडेच लीक झालेल्या प्रमोशनल इमेजेसवरून असे दिसून आलं की बेस आणि प्लस व्हेरिएंट त्यांच्या मागील मॉडेल्सप्रमाणेच डिझाइनसह येतील. तथापि, आगामी अल्ट्रा आवृत्तीचा आकार मागील मॉडेलच्या बॉक्सी डिझाइनपेक्षा अधिक गोलाकार आहे.