हैदराबाद : भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (BNCAP) नं महिंद्रा कंपनीच्या XEV 9e आणि BE 6 या इलेक्ट्रिक SUV च्या क्रॅश टेस्टला 5 स्टार रेटिंग दिलंय. महिंद्रा ब्रँडच्या या दोन्ही EV कारला प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पाच-स्टार सुरक्षा रेटिंग मिळालंय. BNCAP नं दोन्ही इलेक्ट्रिक SUV च्या सर्वोच्च-स्पेक प्रकारांची चाचणी केली आहे. यात भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारांसाठी सुरक्षा रेटिंग लागू आहेत.
महिंद्रा XEV 9e
पाच-स्टार रेटिंगसह, महिंद्रा XEV 9e ला क्रॅश टेस्ट दरम्यान प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्ण 32 गुण मिळाले आहे, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले आहे. शिवाय, EV नं डिफॉर्मेबल बॅरियर आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर चाचण्यांमध्ये AOP साठी पूर्ण 16 गुण मिळवले. BNCAP नं साईड पोल इम्पॅक्ट टेस्टसाठी गाडीला "ओके" रेटिंग दिलंय.
Safety ratings of Mahindra – XEV 9E.
— Bharat NCAP (@bncapofficial) January 16, 2025
The XEV 9E has scored 5-Star Safety Ratings in both Adult Occupant Protection (AOP) and Child Occupant Protection (COP) in the latest Bharat NCAP crash tests.#bharatncap #safetyfirst #safetybeyondregulations #morestarssafercars #drivesafe pic.twitter.com/Dux6tElRLG
महिंद्रा BE 6
XEV 9e प्रमाणेच, महिंद्रा BE 6 ला देखील पाच-स्टार रेटिंग मिळालंय. या रेटिंगसह, इलेक्ट्रिक SUV सर्वोत्तम BNCAP रेटिंग असलेल्या कारमध्ये समाविष्ट झाल्या आहे. या इलेक्ट्रिक SUV नं प्रौढ प्रवासी क्रॅश सेफ्टी रेटिंगसाठी 32 पैकी 31.97 गुण मिळवले. दरम्यान, EV ला चाइल्ड ऑक्युपेंट क्रॅश टेस्टसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले.
Safety ratings of Mahindra – BE6.
— Bharat NCAP (@bncapofficial) January 16, 2025
The BE 6 has scored 5-Star Safety Ratings in both Adult Occupant Protection (AOP) and Child Occupant Protection (COP) in the latest Bharat NCAP crash tests.#bharatncap #safetyfirst #safetybeyondregulations #morestarssafercars #drivesafe pic.twitter.com/PjY1Q4cdeG
महिंद्रा XEV 9e, BE 6 सुरक्षा वैशिष्ट्ये
महिंद्रा XEV 9e आणि BE 6 दोन्ही ब्रँडच्या INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. त्या लेव्हल २ एडीएएस सूट सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. यात लेन बदल, आपत्कालीन स्टीअरिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट, फ्रंट कोलिजन वॉर्निंग असे बरेच वैशिष्ट्ये येतात. यासोबतच, ईव्हीजमध्ये 360 -डिग्री कॅमेरा, हेड्स-अप डिस्प्ले (HUD), एक TPMS, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, सुरक्षित 360 लाईव्ह व्ह्यू , रेकॉर्डिंग, इंटेलिजेंट इलेक्ट्रॉनिक ब्रेक बूस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट फॉग लॅम्प, कॉर्नरिंग लॅम्प, ऑटो बूस्टर लॅम्प आणि सात एअरबॅग्ज देखील आहेत.
हे वाचलंत का :