ETV Bharat / state

सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरण, आज दिवसभरात काय काय घडलं? - SAIF ALI KHAN KNIFE ATTACK

हल्लेखोराने सैफवर सहा वार केलेत. यातील दोन वार हे गंभीर स्वरूपाचे होते. त्यामुळे सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Saif Ali Khan knife attack case
सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2025, 6:42 PM IST

Updated : Jan 16, 2025, 7:45 PM IST

मुंबई - बॉलीवूडचा नवाब अशी ओळख असलेला अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडालीय. चोरी करण्यासाठी आलेल्या हल्लेखोराने गुरुवारी मध्यरात्री दोन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. चोरी करण्यासाठी आलेल्या अज्ञात इसमाने केलेल्या या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. या हल्लेखोराने सैफ अली खानवर सहा वार केलेत. यातील दोन वार हे गंभीर स्वरूपाचे होते. त्यामुळे सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या तब्बल 12 टीम तैनात : या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या तब्बल 12 टीम तैनात करण्यात आल्यात. या सर्व टीम संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत असून, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून सैफ अली खान ज्या इमारतीत राहतो, त्या इमारतीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलेत. सोबतच या इमारतीच्या आजूबाजूलादेखील ज्या इमारती आहेत, त्या इमारतींचेदेखील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलेत. यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दोन संशयित आढळलेत. या संशयितांचा शोध घेण्यात आला आणि प्रभादेवी परिसरातून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दोन्ही संशयितांची अद्याप ओळख पटली नसली तरी या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सैफ अली खानच्या घराबाहेरून ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांनी घेतलेला आढावा (Source- ETV Bharat)

सैफ अली खानच्या लहान मुलाच्या खोलीत संशयित आरोपी : संबंधित आरोपी इतक्या उच्चभ्रू हायटेक सोसायटीत कसा घुसला? याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित संशयित आरोपी सैफ अली खानचा सर्वात लहान मुलगा जहांगीरच्या खोलीमध्ये लपून बसला होता. त्याला सैफ अली खानच्या हाऊस हेल्प लिमा यांनी पाहिले आणि त्यांनी आरडाओरड केली. लिमा यांनी आरडाओरड केल्याने या आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे सैफ अली खान त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडला. तेव्हा या आरोपीने सैफ अली खानवरदेखील चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात लिमा यादेखील जखमी झाल्याने त्यांनाही सैफ अली खानसोबत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, लिमा यांच्या जखमा किरकोळ असल्याने मलमपट्टी करून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आलाय.

सैफ अली खानच्या घरातून आरोपी बाहेर पडतानाचा सीसीटीव्ही (Source- ETV Bharat)

निवृत्त पोलीस अधिकारीदेखील ऍक्टिव्ह मोडवर : दरम्यान, यात महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासात निवृत्त पोलीस अधिकारीदेखील ऍक्टिव्ह मोडवर आले असून, निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडून सलमान खानच्या घराच्या परिसराची पाहणी करण्यात आलीय. पोलीस अधीक्षक दर्जाचे निवृत्त अधिकारी इक्बाल शेख यांनी या परिसराची पाहणी केलीय. निवृत्त पोलीस अधिकारी इक्बाल शेख एका रिक्षातून आले. त्यांनी बाहेरून संपूर्ण इमारतीचा परिसर पाहिला. त्यानंतर पुन्हा रिक्षात बसले आणि निघून गेले. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत निवृत्त अधिकारीदेखील ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून येतंय.

हेही वाचा :

  1. सैफ अली खानवर घरात घुसलेल्या चोराकडून वार, रुग्णालयात उपचार सुरू
  2. करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह पापाराझीवर संतापला, व्हिडिओ व्हायरल - kareena kapoor

Last Updated : Jan 16, 2025, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.