महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S24 EF लाँच, जाणून घ्या खास फिचर - SAMSUNG GALAXY S24 EF LAUNCHED - SAMSUNG GALAXY S24 EF LAUNCHED

Samsung Galaxy S24 EF : सॅमसंगनं आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Samsung Galaxy S24 EF स्मार्टफोन शक्तिशाली वैशिष्ट्यांसह लॉंच केला. यामध्ये तुम्हाला Exynos 2200e प्रोसेसर मिळेल. या हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय.

Samsung Galaxy S24
Samsung Galaxy S24 (Samsung)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 27, 2024, 2:52 PM IST

Updated : Sep 28, 2024, 3:42 PM IST

हैदराबाद Samsung Galaxy S24 :Samsung Galaxy S24 EF स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले, Exynos प्रोसेसर आणि AI फीचर्स आहेत. याशिवाय, तुम्हाला या फोनवर 7 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देखील मिळतील. Samsung Galaxy S24 EF मध्ये जनरेटिव्ह एडिट, पोर्ट्रेट स्टुडिओ, एडिट सजेशन, सर्कल टू सर्च, लाइव्ह ट्रान्सलेशन, नोट असिस्टंट यासारखी अनेक AI वैशिष्ट्ये मिळतील. मात्र, सध्या हा स्मार्टफोन अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे. थोड्याच दिवसात भारतात देखील हा फोन लॉंच होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये.

काय आहेत फिचर? : Samsung Galaxy S24 EF मध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1900 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. स्क्रीन संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 2400e प्रोसेसरवर काम करतो. हँडसेटमध्ये 8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजचा पर्याय आहे. हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 वर काम करतो. यामध्ये तुम्हाला सर्व AI फीचर्स मिळतील, जे कंपनी आपल्या फ्लॅगशिप उपकरणांमध्ये प्रदान करते. स्मार्टफोन 7 वर्षांच्या OS आणि सुरक्षा अपडेटसह येतो.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर : या फोनचं IP68 रेटिंग आहे. फोनमध्ये 50MP मुख्य लेन्स, 8MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत. समोर कंपनीनं 10MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसच्या संरक्षणासाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर प्रदान करण्यात आलं आहे. स्मार्टफोनला पॉवर करण्यासाठी 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 25W चं वायर्ड चार्जिंग आहे. फोन वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.

किती आहे किंमत? : कंपनीनं हा फोन दोन कॉन्फिगरेशन आणि तीन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. तुम्ही फोन निळ्या, ग्रेफाइट आणि मिंटमध्ये रंगात खरेदी करता येईल. हा फोन 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजसह येईल. सॅमसंगनं भारतीय बाजारात फोनची किंमत जाहीर केलेली नाहीय. मात्र, जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत जाहीर करण्यात आलीय. हा स्मार्टफोन $649.99 (अंदाजे रु. 54,355) ला खरेदी करता येईल. हा फोन काही देशांमध्ये प्री-ऑर्डरसाठीही उपलब्ध आहे.

हे वाचलंत का :

  1. रेडमी वॉच 5 लाइटची दमदार एंट्री, 18 दिवसांपर्यंत टिकते बॅटरी - Redmi Watch 5 Lite Launched
  2. महिंद्रा थार रॉक्सचं बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू, दसऱ्याला मिळणार डिलिव्हरी - Mahindra Thar Roxx booking
  3. Vivo V40e ची भारतात जोरदार एंट्री, 50MP आय ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा, 'इतकी' आहे किंमत - Vivo V40e
Last Updated : Sep 28, 2024, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details