हैदराबाद : सॅमसंगची स्मार्ट रिंग लवकरच लाँच होण्यास सज्ज आहे. जर तुम्ही स्मार्ट रिंग खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण तुम्हाला अपडेटेड फीचर्ससह नवीन रिंग खरेदी करण्याची संधी जानेवारीत मिळण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2, जानेवारीमध्ये लाँच होणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 च्या फीचर्सबद्दल अधिक जाणून घेऊया.
सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 :तुम्हाला नवीन वर्षासाठी एक खास इलेक्ट्रिक गॅझेट खरेदी करण्याचं असेल, तर ही बातमी नक्की वाचा. कारण आता तुम्हाला एक खास रिंग मिळू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2. 22जानेवारी रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. हा सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 एआय फीचर्ससह लाँच केली जाऊ शकतो. विशेषतः, त्याला पूर्वीपेक्षा चांगले IP69 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग मिळालंय.
सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 ची वैशिष्ट्ये :? एका अहवालानुसार, सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 ला रिंगच्या आकारात देखील पर्याय दिले जाऊ शकतात. जरी सध्या 9 आकारांच्या रिंग्ज असल्या तरी, भविष्यात तुम्हाला त्या 11 आकारांमध्ये मिळू शकतात. कंपनीचा असा विश्वास आहे की आकार वाढवल्याने पर्याय अधिक लोकांना आकर्षित करतील. याशिवाय, सॅमसंगनं तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 रिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर्स दिल्याचं म्हटलं जातं. जर तुम्ही या सर्व फीचर्सवर नजर टाकली तर, सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 रिंग मागील फीचर्सच्या तुलनेत अपडेटेड आहे.