हैदराबाद Flipkart Big Billion Day Sale Offer :सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या मोबाईल उत्पादन कंपनीच्या मोबाईल फोनवर ग्राहकांना भरघोस सुट मिळणार आहे. आज भारतातील सर्वाधिक विक्री होणारा 5G स्मार्टफोन गॅलॅक्सी A14 तुम्ही फक्त 9999ल रुपयांमध्ये खरेदी करू शकता. मात्र, हा फोनवर कुठं ऑफर मिळणार आहे. यात कोणते फिचर आहे? चला जाणून घेऊया..
Samsung Galaxy A14 5G फिचर :Samsung Galaxy A14 5G मध्ये सिग्नेचर फ्लोटिंग कॅमेरा डिझाइनसह सॅमसंग गॅलॅक्सीचा एकमेव 50 मेगापिक्सल ट्रिपल रिअल कॅमेरा तुम्हाला मिळणार आहे. तसंच हाय क्वॉलिटी फोटोंसाठी डेप्थ मॅक्रो लेन्स, 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले तसंच डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह हा फोन तुम्ही खरेदी करू शकता.
तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध : Samsung Galaxy A14 5G डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये एक्झिनॉस 1330 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन सेगमेंटमधील लीडिंग गीकबेंच स्कोअर्स वितरित करतो. ज्यामधून सुलभ तुम्हाला फोन वापरण्याचा सुलभ अनुभव मिळतो. तसंच, या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसह जवळपास 6 जीबी रॅम प्लस आहे, ज्यामुळं एकाच वेळी अधिक ॲप्सचा तुम्ही वापर करू शकता.
'वॉइस फोकस' फिचर :Samsung Galaxy A14 5G मध्ये सॅमसंगचं अद्वितीय 'वॉइस फोकस' फिचर देखील आहे. जे पार्श्वभूमीमधील आवाजाला दूर करत कॉल्सदरम्यान वॉइस क्वॉलिटी वाढवतं. यामुळं तुम्ही रेल्वे, बस, गर्दीच्या ठिकाणी देखील फोनवर सुस्पष्टपणे संवाद साधू शकता. हे फिरच गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स, व्हॉट्सॲप व झूम अशा व्हिडिओ आणि वॉइस कॉलिंग ॲप्ससोबत देखील काम करतं. तसंच, सर्वोत्तम वन यूआय 6 सॉफ्टवेअरसह वापरकर्ते व्हिडिओ वॉलपेपर्स किंवा इमोजीचा वापर करत लॉक स्क्रिन सानुकूल करू शकतात. वापरकर्ते व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट्ससाठी कॉल पार्श्वभूमी देखील वैयक्तिकृत करू शकतात.
इथं मिळणार फोन : ग्राहक 26 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजमध्ये हा फोन खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 17 हजार 499 रुपये आहे. मात्र, तुम्हाला 4 GB + 128 GB व्हेरिएण्टसाठी फक्त तुम्हाला 9999 मोजावे लागतील. या डिलमध्ये 6 हजार 500 रूपयांची नियमित सूट तसंच एक हजार रूपयांची त्वरित सूट मिळणार आहे. 6GB + 128 GB व्हेरिएण्ट फक्त 10 हजार 999 रूपयांत उपलब्ध असेल. या किमतीमध्ये 9000 रूपयांची नियमित सूट तसंच 1 हजार रूपयांची त्वरित सूट मिळतेय. या फोनची मूळ किंमत 20हजार 999 रूपये आहे.
हे वाचलंत का :
- Samsung Galaxy M55s 5G फोनवर दोन हजारांची सुट, मॉन्स्टर शॉट्ससाठी 50MP ट्रिपल कॅमेरा - Samsung Galaxy M55s 5G Launched
- इतर देशांपेक्षा भारतात आयफोन का विकला जातो महाग?, जाणून घ्या कारण - Apple iPhone 16 series price
- दिवाळी सेलमध्ये One Plus स्मार्टफोन्सवर बंपर सुट, मोफत EMI मिळतोय लाभ - One Plus Diwali Sale 2024