हैद्राबाद Safe Mobile Payments :आजच्या डिजिटल युगात, PhonePe सारख्या मोबाईल पेमेंट ॲप्सनी आपण पैसे हस्तांतरित करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. आमच्या स्मार्टफोनवर फक्त काही सेंकदात तुम्ही त्वरित पैसे पाठवू शकता. तसंच प्राप्त देखील करू शकता. अशा अप्सवरून पैसे पाठवताना काळजी घेणं आवश्यक आहे. PhonePe वर पैसे पाठवताना काय खबरदारी घ्यावी, याबद्दल काही माहिती देणार आहोत.
पैसे पाठवताना माहिती तपासा :पैसे पाठवण्यापूर्वी, नाव, मोबाईल नंबर, बँक खात्याचा तपशील दोनदा तपासून पहावा. तुमच्या एका चुकीमुळं तुमचे पैसे चुकीच्या हातात जाऊ शकतात.
घोटाळ्यांपासून सावध रहा : सायबर गुन्हेगार अनेकदा तुम्हाला तुमचा मित्र, कुटुंबातील सदस्य असल्याचं भासवून पैशाची मागणी करतात. त्यामुळं अनोळखी नंबरवरून फोन आल्यास सावध रहा. तसंच पैसे मागत असलेला खरच मित्र, कुटुंबातील सदस्य आहे का हे तपासून पहा. नंतरच पैसे पाठवा.
मजबूत पासवर्ड, पिन वापरा :मजबूत पासवर्ड आणि पिनसह तुमचं PhonePe खातं सुरक्षित करायला हवं. जन्मतारीख, मोबाईल नंबर सारखे पासवर्ड टाकू नयेत.
खात्याचं निरीक्षण करा :कोणताही संशयास्पद व्यावहार तपासण्यासाठी नियमितपणे तुमचा व्यवहाराचा इतिहास आणि खात्यातील शिल्लक तपासा. त्यात काही विसंगती असल्यास तत्काळ PhonePe च्या ग्राहक केंद्राशी संपर्क करा.
सार्वजनिक वाय-फाय टाळा : PhonePe वर पैसे पाठवताना सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळावा. कारण अशा वाय-फायमुळं तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असते. शक्यतो तुमच्या मोबाइल डेटाचाच वापर करावा.