हैदराबाद Revolt RV1 Price Features :रिव्हॉल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल देशातील नंबर 1 कंपनी आहे. कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक कम्युटर बाइक रिव्हॉल्ट RV1 द्वारे दुचाकी स्वारांना एक उत्तम पर्याय दिला आहे. रिव्हॉल्ट मोटर्सचे अधिकारी तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रिव्हॉल्ट R1 दुचाकी लाँच करताना इलेक्ट्रिक मोटारसायकलींची गरज, पैशाची बचत, पर्यावरणीय फायद्यांवर भर दिलाय. रिव्हॉल्ट मोटर्सनं बजेट कम्युटर बाईक खरेदीदारांना RV1 आणि RV1 Plus च्या रूपात एक चांगला तसंच बचत करणारा पर्याय दिला आहे. चला, दुचाकीची किंमत आणि वैशिष्टये जाणून घेऊया...
Revolt RV1 ची किंमत : Revolt RV1 दुचाकीची एक्स-शोरूम किंमत रु. 84 हजार 990 आहे. तसंच RV1+ ची एक्स-शोरूम किंमत रु. 99 हजार 990 आहे. या प्रास्ताविक किमती आहेत, ज्या सणासुदीला लक्षात घेऊन दिल्या आहेत. ही इलेक्ट्रिक बाइक 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, जी दिसायला सुंदर आहे. रिव्हॉल्ट RV1 चं बुकिंग सुरु झालं आहे. त्यांची डिलिव्हरी देखील येत्या 10 दिवसात सुरु होईल.
रिव्हॉल्ट RV1 ची बॅटरी आणि गती : रिव्हॉल्ट मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक बाइकच्या दोन्ही प्रकारांतील बॅटरी, गतीबद्दल बोलायचं झाले तर, त्याच्या स्वस्त व्हेरिएंट RV1 व्हेरियंटमध्ये 2.2 kWh बॅटरी आहे. जी एका चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. त्याच वेळी, RV1+ प्रकारात 3.24 kWh बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 160 किलोमीटरपर्यंत चालू शकते. या बॅटरी IP67 रेटेड आणि पाणी प्रतिरोधक आहेत. रिव्हॉल्ट RV1 चा टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रति तास आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये बिल्ट इन चार्जर स्टोरेज आहे. फास्ट चार्जरच्या मदतीनं अवघ्या दीड तासात रिव्हॉल्ट RV1 पूर्णपणे चार्ज होऊ शकते.