हैदराबाद Realme P3 Pro :Realme आज 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता भारतात त्यांचा मिड-रेंज फोन Realme P3x आणि Realme P3 Pro लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वीच, कंपनीनं या मालिकेतील अनेक वैशिष्ट्यांची पुष्टी केली आहे. या सेगमेंटमधील हा पहिला फोन आहे, जो डार्कमध्ये ग्लो फीचरसह येतो. या फोनला ट्रिपल आयपी रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी आहे.
कुठं पाहणार लाईव्ह?
जर तुम्हाला लाँच इव्हेंट पहायचा असेल तर तुम्ही तो कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता. या मालिकेपूर्वी कंपनीनं Realme P2 मालिका लाँच केली होती, ज्यामध्ये Realme P2 Pro ची किंमत 21,999 रुपये होती. कंपनी P3 Pro ची किंमत सुमारे 25000 रुपयांपर्यंत ठेवू शकते, अशी अपेक्षा आहे. ज्यांना हा फोन खरेदी करायचा आहे, ते Realme.com आणि Flipkart वरून तो खरेदी करू शकतात.
स्पेसिफिकेशन्स(अपेक्षित)
Realme P3 Pro नेब्युला ग्लो, गॅलेक्सी पर्पल आणि सॅटर्न ब्राउन रंगात येईल. यामध्ये, नेब्युला ग्लो व्हेरिएंट ग्लो-इन-द-डार्क डिझाइनसह येत आहे.
- प्रोसेसर : फोनमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 7s जनरल 3 प्रोसेसर असेल. हा आधी लाँच झालेल्या हँडसेटमध्ये असलेल्या प्रोसेसरपेक्षा खूपच शक्तिशाली आहे. हा फोन BGMI साठी 90FPS ला सपोर्ट करतो. कारण फोन Gen 3 चिप आणि GT बूस्ट ऑप्टिमायझेशनसह येत आहे.
- डिस्प्ले : हँडसेटच्या पुढील बाजूस 1.5K रिझोल्यूशनसह क्वाड वक्र स्क्रीन असेल.
- बॅटरी : हँडसेटमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी आहे. यात 80 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.
- कॅमेरा : कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 50 मेगापिक्सेल सोनी IMX896 सेन्सर असेल. यासोबतच, फोनला IP66+68+69 रेटिंग मिळालं आहे. हा फोन पातळ आणि हलका असेल, कारण त्याची जाडी फक्त 7.99 मिमी आहे.
हे वाचलंत का :
- झीस-ब्रँडेड कॅमेरा सेटअपसह Vivo V50 भारतात लाँच, 'या' ठिकाणी आहे खरेदीकरिता उपलब्ध
- एअरटेल, जिओ व्हडाफोनला BSNL ची टक्कर, BSNL आणला सर्वात स्वस्त व्हॉइस ओन्ली प्लॅन
- UPI खात्यातून कट झालेले पैसे तत्काळ होणार जमा, यूपीआयसाठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली लागू